प्रत्येकाला वाटत असतं, आपला संसार सुखाचा असावा

Started by Swapnaja.bhandare, January 03, 2021, 09:34:17 PM

Previous topic - Next topic

Swapnaja.bhandare

Overview:
When you planned all about your future and suddenly something happens and it not only destroy your dreams, it tore you too in pieces.


I tried to explain that situation of us, where one side we all know that we have to move on, we have to be positive, whatever happens happens for reason and bla bla bla..


But deep inside only we know that whatever happened was not acceptable, was not ever come in thought and you unknowingly goes in dark world...


This situation we feel but we can't tell to others in same way.


I tried my best to tell you guys like what someone or me feeling while going through this phase.
..............................................................................................




प्रत्येकाला वाटत असतं, आपला संसार सुखाचा असावा

एकमेकांना समजून घेऊन आनंदात प्रवास करावा.



आपण केलेली असते नवीन सुरुवात,

पाहिलेली असतात खूप स्वप्न,

एकट्याची नाही तर दोघांची मिळून.




असंच स्वप्न रंगवत असताना अचानक अंधार होतो,

दचकून डोळे उघडले तरी अंधार तसाच असतो,
पण आपण निवडलेली वाट बरोबरच आहे समजून
चालत राहतो आपण,
त्या अंधारात...चाचपडत...



पण कधी कधी अंदाज हि चुकतात ना!

हे आपण अगदी विसरूनच जातो,

दोघांच्या स्वप्नामधील एक आता दिसेनासा होतो,
आता त्या अधुऱ्या स्वप्नांचं करायचा काय?

हा विचार पूर्ण सुन्न करून जातो.




आपल्या समोर खूप गोष्टी येऊन उभ्या राहतात,
Independent म्हणून मिरवणारे आपण,

किती हतबल होऊन जातो,
आपल्यालाच उमजत नाही.




मग येतात सल्ले, चर्चा न भावुक करणाऱ्या gossip,

पण आपण नसतो कशातच,
ना आपल्याला काही समजत असतं.




आपण असतो विचारात कि नक्की हे झाला तरी काय?

मोजत राहतो एकमेकांच्या चुका,

आठवत राहतो ते जगलेले क्षण,

अन मग एकत्र नसण्याचं कारण आठवताच, आपला ताबा सुटतो.




नसतं आपल्याला त्या भूतकाळात राहायचं,

ना आपल्याला भविष्य काही दिसत असतं.


आपण फक्त सुन्न असतो आपल्या त्या अधुऱ्या स्वप्नात,

एकटे त्या अंधारात,

ना आपल्याला बाहेर पडायचा असतं,

ना आपल्याला तिथे राहायचं असतं.




वाटत असतं, हा अंधार निघून जावा,

सुटलेला तो हात, परत हातात असावा.




कारण काय ना!

प्रत्येकाला वाटत असतं, आपला संसार सुखाचा असावा

एकमेकांना समजून घेऊन आनंदात प्रवास करावा.

- swapnaja bhandare.