काय करू सांगा दोस्त हो

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 12, 2021, 11:09:48 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.काय करू सांगा दोस्त हो*

दिस सरलं सरलं माह्या झोळीत कष्टचं उरलं.
वाट चुकता जराशी गहाण होतं या डोरलं........

किती आवरू जीवाला रोज पूजितो शिवाला
कोणा कळलाचं नाही कसा पिकतो निवाला...

रोज राखण करतोया रोज पाणी रं धरतोया
राबराबून शेतात उपाशी पोटी रं मरतोया....

किती हालकीचं जीनं डोई कर्जाचा हा शीनं
थोडं सुखात जगता जळके करतात रं पिनं.....

गाव करतंया हासू पाहून नाव ठेवतीया सासू
कसा जगतोया मी कहाणी सांगेल दोस्त परसू .....

कोरड नशीब पदरी आलंया सारं नकोस झालंया
थोडंस हसू होतं गाली आता ते ही गेलंया.....

काय करू सांगा दोस्त हो आता नको झालंया जीणं
कशी जोडू पुन्हा तुटलेली जुनी नात्यांची वीण ....


कविराज. अमोल शिंदे पाटील
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Digambar R Chavan