भावनांची होळी ......

Started by Ashok_rokade24, January 13, 2021, 05:46:19 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

भावनांची माझ्या होळी इथे
झाली |
शब्द मुक झाले अक्षरे
जळाली  ॥ 

अक्षर अक्षर जोडून शब्दांचे
रचीले इमले |
चक्रवात हा चहू दिशांनी स्वप्ने
धूळीस मिळाली ॥

दिवा लावला सारण्या दूर
अंधार |
त्याच दिव्याने झोपडी माझी
जाळीली॥

अवती भवती जमली खोगीर
भरती |
वेळ सरली साथ ही एकांताची
मिळाली॥

कुणी न कुणाचे येथे गर्वाचे
गाठोडे |
गर्व सावलीला झाला साथ ही
सोडली ॥

कितीही ठेविल्या लपऊन
मनी |
तरीही भावनांची नीत होळी
झाली॥

अशोक मु. रोकडे.
मुंबई.