स्वप्न चित्र

Started by शिवाजी सांगळे, January 15, 2021, 06:46:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वप्न चित्र

कळते मला डोकावणे तुझे खिडकीतले
जाणतो मी माझ्यावर प्रेम तुझे असलेले

रेंगाळतात पाऊले दाराशी वेळी अवेळी
करती चुगली पैंजण पायी तुझे घातलेले

छळतो लपंडाव हा चोरट्या कटाक्षांचा
कर मोकळे मनातले भाव तुझे दाटलेले
 
कळे मला सारे लपून पाहण्या वेळावणे
भोवती का माझ्या विश्व तुझे व्यापलेले

त्रासतो मी पण भास आभासाने तुझ्या
पाहण्या प्रत्यक्षात चित्र तुझे रेखाटलेले

किती करावी प्रतिक्षा तु न् मी दोघांनी?
यावे पुर्णत्वास माझे स्वप्न तुझे पाहिलेले

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९