तिचं असंच बोलणं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 26, 2021, 11:01:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तिच असंच बोलणं*

जानेवारी संपतो तोच मी
प्रपोजच्या तयारीला सुरवात केली
तिच्या मनातल्या गणितानं
रात्रीची झोप मात्र चोरून नेली

आत्ता आहोत सोबत नंतर
कोणाचं काय सांगता येत
बघ कॉलेज आहे तो पर्यंत
कसं जीवन सुखी करता येत

नेहमी तिचं असंच बोलणं
काळजाला स्पर्श करायचं
आयुष्याच नातं तिच्याशी
अतोनात पुन्हा घट्ट व्हायचं

कॉलेजचा कट्टा अन पार्किंग
आमच्या दोघांची साक्ष द्यायचा
इथूनचं कशी सुरुवात झाली
याची आठवण मात्र करून द्यायचा

ती म्हणायची नको फेब्रुवारीची वाट
आपण आत्ताच प्रेमाला बहर देऊ
नव्यानं कॉलेज जॉईन झालोय तर
चल कायमचं दोघांत एक रूप होऊ

कोणी तरी जवळच हवं होतं
म्हणून तिला प्रपोज केला होता
फ्रेंडशिपच्या नावा खाली आम्ही
व्हॅलेन्टाईन डे साजरा केला होता

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर