तिच्यामुळेच सारे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 30, 2021, 06:51:53 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तिच्यामुळेच सारे*

तिच्या आठवणीत मी सारे जपले होते
तुटले जे नाते तोडणारे सारे आपले होते

किती सांगू जगा आता मी समजून हे प्रेम
त्यांच्या ह्रदयी केव्हाच प्रेम सारे संपले होते

घ्या उचलून तिरडी आता माझी कोणी तरी
जर दिवस माझे प्रेम भंगाने सारे भरले होते

आता नका नेऊ कोण्या देवळात हा देह माझा
अरे प्रेम मिटवण्यात तेच देव सारे दंगले होते

आता कशाला विनवणी करता त्याला घरच्यांनो
त्यांच्यामुळेच काळजाचे ठोके सारे थांबले होते

बांधा थडगे तिथेच देव्हाऱ्या जवळ माझे आता
तिच्यासाठी आसवांचे जिथे थेंब सारे सांडले होते

वाटले कोणा तर खबर द्या तिला मरणाची माझ्या
अग्नी देईल ती कारण तिनेच प्रेम पत्र सारे जाळले होते


✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर