फुलपाखरू

Started by शिवाजी सांगळे, February 06, 2021, 12:59:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फुलपाखरू

स्वप्न वेडे पाहिले आता...स्वप्नात जाता
सामावली कवेत सृष्टी तुज कवेत घेता

मांदियाळी या मनी वेगळ्या भावनांची
पुर्णत्वा येणार केंव्हा स्वप्नांचा वेध घेता

कळी दर कळी शृंगारली बहरली फुले
पानांस देखील रंग हिरवा सज्ज आता

गंधास करी धुंद गंधवेड्या कसे कळावे
गंध होणे मिसळून इतुकेच उरले आता

स्वप्न वेडे पाहिले आता...स्वप्नात जाता
व्हावे फुलपाखरू हलकेच मन रे आता

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९