बाप म्हणजे असतो तरी काय?

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, February 10, 2021, 07:26:26 PM

Previous topic - Next topic
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय?
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय।
घराचा खांब असतो वादळात ठाम असतो।
प्रत्येक निर्णयाचा अधिकारी शाम असतो।
प्रत्येकाचा बाप म्हणजे पंढरीचा राम असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय
फाटके नेसुनिया अर्ध खाऊनिया लेकाचा मुखाचा खास असतो।
संसार डोक्यावर ठेवलेला स्वतः ची हौस विसरून दुसऱ्याची हौस पुरविणारा बाप असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय न रडता डोळ्यांनी प्रेम करणारा बाप असतो।
बाप म्हणजे असतो तरी काय स्वतः रण रण राबून सावली देणारा बाप असतो।
आई वडिलांची अखेर पर्यत काळजी घेणारा बाप असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय आजार बाजूला सारून दुसऱ्याची काळजी घेणारा बाप असतो।
स्वतः उपाशी राहून कुटुंबाची काळजी घेणारा बाप असतो।
स्वतः अडाणी राहून मुलांना शिकविणारा बाप असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे आभाळ वाणी माया लावणारा,पेरलेले उगविणारा, मोठ्या संकटात सापडल्यावर पहिला मुखात येणारा बापरे म्हणजे बाप असतो।
मुलां साठी हाडांची काडे आणि पुंजी चे गाठोडे बनविणारा बाप असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
बाप म्हणजे असतो तरी काय कधी न थांबणारा आणि कधी न वाकणारा धिप्पाड असा सकाम बाप असतो।
ऊन गेले पाऊस गेले उपाशी पोटी ध्यास प्रेम वात्सल्य आणि दया देणारा बाप असतो।
बाप म्हणजे प्रत्येकाच्या देहाला देणारी काया म्हणजे बाप असतो।
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
लेखक:-
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷
  ..✍🏻✍🏻✍🏻 हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ
🌼🌸🌹🍁🌺🌷🌼🌸🌹🍁🌺🌷