छळ भास

Started by शिवाजी सांगळे, February 13, 2021, 11:01:55 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

छळ भास

भास तुझा छळतो मला...का असा
झोका स्मृतींचा हा झुलतो का असा

दरवळतो अवेळी श्वासात गंध तुझा
गंध भासात जगतोय मी...का असा

रंगते कसे मन तरुण पानात हिरव्या
तुज रंगात रंगण्या उल्हास का असा

कवडसा खट्याळ खेळता तुज संगे
कासावीस जीव माझा हो का असा

जीव वेडा जडला तुजवरी का असा
भास तुझा छळतो मला...का असा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९