तुझ्या येण्याने!!

Started by Vedanti Nimbre, February 15, 2021, 07:04:20 PM

Previous topic - Next topic

Vedanti Nimbre

जगात इतके लोक असताना
तूच का रे हवा मला..??
नकळत या क्षणात एका
प्रेम तुझ पटलं मला..

नाती ही नाजूक असतात
सावरली तर साजूक असतात
कधीही न घडलेलं असं
प्रेम तुझ पटलं मला..

प्रेम तुझ पटून गेलं
नवं जगणं शिकवत गेलं
तुझ्या येण्याने जीवन माझं
अलगूच पणे मोहरुन गेलं💙
             




Vishal Rajaram Pawar


komal jagtap



Atul Kaviraje

Re: तुझ्या येण्याने!!

Re: तुझ्या येण्याने!!

वेदांती मॅडम, खरं आहे, जीवन एकट्याने जगण्यात काहीही अर्थ नाही. ते एकट्याने जगणं निरास असत, रटाळ असत, वाळवंट असत, रुक्ष असत, जोवर कोणी आपल्या आयुष्यात येत नाही, जो आपल्या अत्यंत जवळचा, आवडीचा असतो.

     पण, प्रेम हे फक्त होण्यावर नसत, किंवा पटण्यावर नसत, तर ते त्या व्यक्तीला अंतर - मनातून ओळखण्यावर असत. आणि तेच खरं प्रेम असत. कुणा व्यक्तीच्या आयुष्यात येण्याने, जी सुंदर फुलबाग फुलते, हे त्या प्रेमी व्यक्तींना चांगलेच ठाऊक.

     आपलंस कुणी असत तिथे
     नकळत ओळख पटत जाते
     प्रेम घेऊन भरल्या कुपीत
     जीवनात कुणी येत असतं

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक- रविवार -२३.०५.२०२१