जोडवी तीझ्या पायात...

Started by Rushi.VilasRao, February 27, 2021, 08:24:00 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

रोजची च होती वाट...
अन् रोजचीच होती वेळ....
चालता चालता त्या वाटे वर...
आज अचानक ती दिसली....
शेजारून ती जाताना पाहून तिला मी थोडा स्थब्द झालो...
पाहून तिला सौंदर्यात तीझ्या मी पुरता बुडून गेलो....
पाहत होतो रोज तिला...
चाललं अस थोडे दिवस....
एकदा शेजारच्या मंदिरात झाली थोडी ओळख...
ती रोज दिसावी म्हणून चकरा मंदिराच्या मारू लागलो....
आली ती दर्शनाला तर एकमेकांकडे पाहून हसू लागलो....
कोण जाणे कोणास ठावूक काय झालं मनाला....
बोलून तर बघ तीला म्हणून माझं मन म्हणू लागलं स्वतः ला....

writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)

हो ,नाही ,म्हणता म्हणता ठरल एकदा बोलून बघू....
झुरत अस राहण्या पेक्षा थोड धाडस करून बघू....
उजाडला तो दिवस....
केली तयारी मनाची....
आवरा आवरी करून सारी धरली वाट मंदिराची....
रस्त्याने जाता जाता घेतली फुल गुलाबाची....
जमेल नक्की जोडी आमची म्हणून स्वप्न रंगू लागली मनाची...

आलो मंदिरा जवळ...
थांबली होती कोपऱ्यावर ती....
गेलो तिझ्या जवळ....
बोललो तिला मनातल....
स्विकारशील का माझं प्रेम म्हणून
केली पुढ्यात फुल...
बोलली नाही ती काही बारीक हसली गालात....
मी ही पाहिलं खाली हसलो थोडा मनात....
पाहिलं तिने पायाकडे तीझ्या म्हणून मीही मारली नजर...
पाहतो तिझ्या पायाकडे तर काय...
जोडवी तीझ्या पायात....
स्माईल छोटीशी देवून गेली ती निघून....
मन माझं झालं सुन्न अन् पडल जरा दुःखात...
गोष्ट इथेच शांत झाली....
भेट पुन्हा घडली नाही....
कारण पायांनी माझ्या पुन्हा वाट त्या मंदिराची धरली नाही....
पायांनी माझ्या पुन्हा वाट त्या मंदिराची धरली नाही...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan