नशीब नव्यानं पुन्हा प्रश्न विचारायचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 07, 2021, 03:48:15 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.नशीब नव्यानं पुन्हा प्रश्न विचारायचं*

तुझ्या माझ्या प्रेमाचं अंतर
कळायला आणि जुळायला
जरासा वेळच लागला बघ
कारण तुझं माझं भेटणं
देवाला ही मान्य नव्हतं
भेटण्याच्या अन मिलनाच्या
बाता तू न केलेल्याचं बऱ्या होत्या
तुझ्या अन माझ्या आयुष्याची
नाळ जर वेगळ्याच असतील तर
विरोध तुझा ही नव्हता माझा ही नव्हता

पण हेच पाहून नशीब नव्यानं पुन्हा प्रश्न विचारायचं.....

की ......

तू आणि ती खरंच सुखानं नांदणार होता का?

असं किती दिवस जगावं मी
एकटं एकटं झुरावं मी
साऱ्या वाटा चुकू लागल्या
पापण्या ही सुकू लागल्या
तू समोर येशील मिठीत घेशील
वाटलं अचानक सुखद धक्का देशील
हे सारं सारं स्वप्ना सारखं विरून गेलं
जे व्हायचं नव्हतं नेमकं तेंच झालं

पण हेच पाहून नशीब नव्यान पुन्हा प्रश्न विचारायचं.......

की........


तू आणि ती खरंच सुखानं नांदणार होता का?

आता कोणत्या शब्दात
नशिबाला उत्तर देऊ सांग तूच
साऱ्या आयुष्याचा खेळ झाल्यावर
अस जीवापाड प्रेम करणं अंगलट आल्यावर
त्याच तरी काय चूकल त्यानं तुला ओळखलं होतं
म्हणून तर प्रश्नाचं पुस्तक त्यानं समोर उघडलं होतं

प्रेम कविता करता करता
काळजावर विरहाच्या कविता उमटू लागल्या
सुखाला आता दुःखाच्या इंगळ्या झटू लागल्या

पण हेच पाहून नशीब नव्यानं पुन्हा प्रश्न विचारायचं.....

की......

तू आणि ती खरंच सुखानं नांदणार होता का ?


कविराज.अमोल शिंदे पाटील
मो.९६३७०४०९००.
अहमदनगर