विरहातले प्रेम

Started by अश्विनि सुमित चितोडे, March 15, 2021, 07:10:21 PM

Previous topic - Next topic
दिसलीस तु नि वेडा झालो
माझ्या स्मृतींना हरवून गेलो
नयनी तुझ्या मी पार बुडालो
सागरातला मोती झालो

जवळी माझ्या शब्द न उरले
तुला बघूनी भान हरवले
तुझी नी माझी प्रीतही जुळली
चालता चालता तु वाट का वळली

जाहला आपला मार्ग हा वेगळा
दुःख असह्य भावनांचा विरंगुळा
चुकलेच माझे हे आता कळले
नशिबाने मला गं असे का छळले

स्वर्ग तुझे परी असेच असुदे
संसारी वेदना कधीच नसुदे
प्रेम माझे हे तुलाच अर्पण
आठवणीत तुझिया प्रिये असुदे मी पण