असंच व्हायचं तिचं माझं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 17, 2021, 11:07:02 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.असंचं व्हायचं तिचं माझं*

असचं व्हायचं तिचं माझं कधी कधी
आसवं लपवायला मी जागा शोधायचो
पण ती समोर येऊन डोळ्यातले आसवे लपवून
मला हसवायला यायची
एक वेळीच फिलिंग यायची तेव्हा..........
तिचं दुःख माझं दुःख समजायचो
तिच्या आसवांना मी पाहुणा म्हणायचो.....
अन नकळत तिचा हसरा चेहरा पाहून हसायचो.......

अस होईल का पुन्हा कधी...?

प्रेम करण्याची ती दुनिया
तिच्या असण्याची किमया
जगण्याला वेगळं वळण द्यायचं
पण मला वाटत नाही आम्ही जगलो
ते जीवन अत्ता कोणी जगत असेल
फक्त तिच्या एक नजरेचा कायल मी
फक्त प्रेम आणि फक्त प्रेम या पलीकडे काय नाही

खरंच प्रेम हे प्रेम असत या पलीकडे काय नसतं....

प्रेम व्हावं तर जीवापाड व्हावं
शरीरावर नाही तर आत्म्यावर व्हावं
तिच्या हसण्यावर व्हावं
तिच्या रुसण्यावर व्हावं
ती दिसली नाही की तिच्या स्वप्नांवर व्हावं
असंच प्रेम व्हावं पण ........
फक्त अन फक्त तिच्या प्रत्येक श्वासावर व्हावं......

आज ही ती असते जवळ कुठे तरी
पण फक्त तिचा तो स्पर्श अनुभवत असतो
अलगत कधी कधी येऊन मस्करी करतो
तेव्हा ती जवळचं असल्याचा भास होतो
पुन्हा नव्यानं मृगजळासारखा सुगंध दरवळतो.........


कविराज.अमोल शिंदे पाटील
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

प्रेम व्हावं तर जीवापाड व्हावं
शरीरावर नाही तर आत्म्यावर व्हावं
तिच्या हसण्यावर व्हावं
तिच्या रुसण्यावर व्हाव....

khup chan lihla amolji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]