फक्त तू आणि मी

Started by Pratik7676, March 23, 2021, 04:14:44 PM

Previous topic - Next topic

Pratik7676

असून ही तू... नसून ही तू
सगळी कडे मला दिसतेस तू

झोपेत पडणारे मखमली स्वप्न तू
यशाकडे जाण्याचा मार्ग ही तू...

तुझ्या आठवणीत होते सारे काम
तू नाही जवळ याचे कुठे भान..
 
आठवतो तो दिवस लख्ख
जेंव्हा पहिल्यांदा पाहिलं तुला
हरवलो होतो तुझ्यातच
दुसरे काही कळेना मला...

तू जवळ नसताना तर
नसतोच माझ्यात मी
रात्र -रात्र छळतात सखे
तुझ्या गोड आठवणी गं ..

पावसात मातीचा  येणारा स्वर्गसुंदर वास ही तू
ओल्या मातीत उगवलेल्या अंकुराचा भास ही तू...



             *उगले प्रतीक विष्णू*
                  📞७०५७४२७६७६