प्रेम कविता

Started by pramodini, March 24, 2021, 02:15:49 PM

Previous topic - Next topic

pramodini

पिंपळ

योगायोगी अचूक बोललास तू
पिंपळच होणारे आपल्या नात्याचं
भूतकाळ वर्तमानकाळ भाविष्यकाळ
मागे सोडू फक्त आठवणीना
ज्या जागोजागी खुणावतील
किंवा कधीतरी हवेत विरून जातील
एखादि आठवण सहज सांगड घालेल
तर, एखादी आठवण आपण ठरवून विसरू.
कानात वाजत राहतील आपले गोड संवाद
कधी तुझ्या बुटांचा आवाज
तर कधी तुझा दीर्घ श्वास
माझी मोकळ्या पाठीवर फिरणारे तुझे हात
आजही तसेच फिरतील
तेव्हा,
तो स्पर्श आपोआप एक नवी कविता करेल
फक्त ती तुझ्या पर्यंत पोहचणार नाही ह्याचीच खंत उरेल
पावसाची मोठी सर ओसरल्यावर
शांत झालेल्या त्या निसर्गाला पाहण्यापूर्वीच मी माझी कूस बदलेन
तो ओलावा तसाच राहील
पुन्हा उनं येईपर्यंत

-प्रमोदिनी एक कविता
  Channel link :https://www.youtube.com/channel/UCGZ0_DmxtfOv6GWaZgRLjPQ