यादी

Started by शिवाजी सांगळे, March 25, 2021, 05:46:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

यादी

यादी माझ्या स्वप्नांची...मांडावी कशी
वाटेतून प्रगतीच्या वजा करावी कशी

मनच्या इच्छा न् स्वप्नांची अतूट जोडी
पाठ जाणीवांची वयाने सोडावी कशी

घडवतात,सजवतात स्वप्ने जीवन सारे
अपूर्णतेसाठी त्यां झोप मोडावी कशी

उमलता, बहरता पाकळी ती फुलाची
गंधास आपुल्या स्वतः विसरावी कशी

ध्येयास साथ मजला अनेक स्वप्नांची
यादी मनातली त्यांची..मांडावी कशी

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९