समजत नाही

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2021, 02:36:35 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

समजत नाही

अहंकारा पुढे प्रेमाला किंमत नाही?
घ्यावी कुणी माघार समजतच नाही

तोच आहे मी?तुही तशीच आहेस?
तरी वाढला का दूरावा कळत नाही

जिद्दी स्वभाव माझा का हट्टी तुझा?
समजण्या फरक यातला मार्ग नाही

समज गैरसमज ते दोघात नित्याचे
समजून घ्यावे कुणी हेच होत नाही

मानले तर गत आयुष्य सुलभ होते
तऱ्हा जगण्याची तशी ठेवली नाही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९