पुनर्भेट

Started by Umesh Mahadeo Todakar, April 06, 2021, 04:29:52 PM

Previous topic - Next topic

Umesh Mahadeo Todakar

भेटलीस का पुन्हा

दुरचं जायचं होतं तर

बोललीस का पुन्हा

अबोल व्हायचं होतं तर

व्यक्त झाला का शब्द तुझा

अव्यक्त व्हायचा होता तर

लावलीस का आस पुन्हा

दुर जायचं होतं तर

त्या दुरच्या क्षणातचं

खरचं बरा होतो मी

केव्हातरी आठवणीतचं

तुझ्या रमत होतो मी

पण आजकाल पुन्हा

चेतना माझी जागवलीस

अव्यक्त व्हायचंच होत तर

का व्यक्त पुन्हा झालीस

ना मिलनाची आस आहे

ना भेटण्याचा  ध्यास आहे

आयुष्यातील काही क्षण

व्यक्त करण्याची आस आहे

वाटले जरी गतआठवणींना

व्यक्त व्हावेसे, सोबत यावेसे

त्याला मी निरूत्तरच आहे

पण ...........................

जाणवते आज मला भावना टोचल्याचे

दिवस होते आज पुन्हा व्यक्त होण्याचे

लांबच्या प्रवासात दुरूनचं हाक देण्याचे

लांबच्या प्रवासात दुरूनचं हाक देण्याचे


***** उमेश महादेव तोडकर *****