हे स्मशान

Started by ranjit sadar, April 06, 2021, 10:21:39 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

किती सदा सुन्सान
गावातल हे स्मशान
संपनार मानवाच हे
या देहाच सर्व वजन

डाग देतांना आत्मा
होत देहाच हो दहन
बापाचा देह मुलांना
जिंवत होईना सहन

वाट लेकाची पाहता
खपले बापाचे नयन
शेतात भांडन लेकाच
टाकल वाटणीच लवन

कष्ट करून बापाने पुर
केल लेकाच सार सपन
जमीनीच्या खाली त्याला
शेवटी पडल देवा लपन

कवी रंजित अंबादास सदर.