रमणीय

Started by शिवाजी सांगळे, April 09, 2021, 09:11:25 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रमणीय

रमणीय संध्याकाळ... रोजच यावी
अन् भेट तिची माझी..रोजच व्हावी

दरवळावे फुलाने गंधाचे गीत गाता
हवा ही मग हळूवार सुगंधीत व्हावी

दूरदूर कडेस डोंगराच्या सावळ रेषा
हलकेच चादर त्यांची श्यामल व्हावी

कुंजारव करीत पाखरांनी परतीच्या
कानात आमुच्या प्रेमळ गाणी गावी

रमणीय संध्याकाळ अशी रोज यावी
अन् सोहळ्याची कहाणी गोड व्हावी

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९