आगमन पावसाचे

Started by Umesh Mahadeo Todakar, April 12, 2021, 10:57:42 AM

Previous topic - Next topic

Umesh Mahadeo Todakar

 थेंब थेंब आकाशातून

पडत राहूदे पृथ्वीवरती

सरीवर सरी पडत राहूदे

आसुसलेल्या पिकावरती

बरेच दिवसाचा दुरावा होता

आज नभातून पूर्ण झाला

पावसाच्या आगमनाने

निसर्ग सारा बहरून गेला

ओल्या चिंब धारणीवरती

सलग थेंब हा पडू लागला

ओढे नाले वाहू लागले

पाऊस वारा वाहू लागला

गार वाऱ्याच्या झुळकी बरोबर

पाऊस थेंब पडू लागला

अवघी धरणी तृप्त झाली

निसर्ग सारा डोलू लागला

पाऊस आला पाऊस आला

निसर्ग सारा आनंदून गेला.

************************

उमेशच्या लेखणीतुन..............

(प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर पडलेल्या पावसावर लिहिलेली कविता )