लॉकडाऊन

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 12, 2021, 12:31:48 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.लॉकडाऊन*

काय लॉकडाऊन करता साहेब
जरा गरिबांचा ही विचार करा
पैसा नाही ओ मागत कोण
फक्त दोन वेळच पोट तरी भरा

दोन घास देतील ओ कोणी ही
पण कर्जाचा खड्डा कसा भरणार
त्याचा काही ही विचार न करता
तुम्ही म्हणता लॉकडाऊन करणार

बँक वाल फायनान्स वाल
हप्त्याचं पैसा सोडणार नाय
हाताला काम नाय धंदा नाय
कर्जाचा हप्ता भरू कसा काय

व्यवसायाच्या भरवशावर
लोन आम्ही काढलं होतं
त्यालाच बंद करून सरकार
तुम्ही रस्त्यावर आणलं होतं

या आधिच्या लॉकडाऊनच्या
जखमा अजून ही भरल्या नाय
अन काय म्हणतात साहेब तुम्ही
आधी तू दुकान बंद करून जाय

दुकान बंद करू साहेब आम्ही
तेव्हडं हप्त्यावाल्याचं बघा जरा
पहिलं त्यांचं तोंड बंद करून
मग हवं तेव्हड लॉकडाऊन करा

कविराज.अमोल शिंदे पाटील
मो.९६३७०४०९००.अहमदनगर