ती आणि तो

Started by Dnyaneshwar Musale, April 15, 2021, 08:11:02 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


तो शिट्टी तर ती कट्टी
ती भात तर तो कुकर,
ती सुगरण तर तो No-कर.

तो lighter तर ती आग,
ती हळद तर तो मिर्ची,
तो खिसा तर ती खर्ची.

ती तुप तर तो सुप
ती बडबड तर तो चुप,
ती झाकण तर तो राखण.

ती  तांब्या तो ठोंब्या
ती  टोप तर तो चोप
ती ताट तर तो घास,
ती श्वास तो सहवास.

ती भाकर तर तो साखर,
ती मीठ तर तो पिठ,
ती सावर तर तो आवर.

ती भास तर तो त्रास
ती छंद तर तो गंध,
तो छत्र तर ती मंगळसुत्र.