महाराष्ट्राचे दैवत

Started by Bhushan Raut, April 21, 2021, 09:07:25 AM

Previous topic - Next topic

Bhushan Raut

🚩|| महाराष्ट्राचे दैवत ||🚩

शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा ,
मुजरा करितो मी ||

स्वराज्याच्या मातीत जन्म घेऊनी ,
जाहलो धन्य मी ||

एकट्याने होणार नाही स्वराज्य स्थापन ,
म्हणोनि मावळ्यांसह केले व्यवस्थापन ||

स्वाभिमानी राजा शिवछत्रपती ,
त्यांना नाही मरणाची भीती ||

कित्येक आले तूफान समोर ,
पण हरला नाही त्याचसमोर ||

परस्त्री मानाया मातेसमान ,
कधी ना केला तिचा अपमान ||

कित्येक मावळ्यांनी दिले बलिदान ,
ऐसे करुनी राखिली स्वराज्याची आन ||

म्हणोनि म्हणतो करुनिया सत्कर्म ,
सोडूनी दुष्कर्म ||

मग वाटेल गर्व शिवबाला ,
सुरक्षित आहे स्वराज्य आपुला ||

करुनी मुजरा महाराष्ट्राच्या दैवताला ,
काय सांगू थोरवी जगाला ||

शब्दात न सांगता यावे ,
असे उपकार माझ्या राज्याचे ||

राजा शिवछत्रपती महाराज घडवायला ,
वंदन करितो अश्या जिजाऊ आईला ||

                   

                                @भुषण राऊत
                          नरोटी (माल), गडचिरोली.