कष्टाळु बाप

Started by ranjit sadar, April 22, 2021, 08:31:26 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

कष्टाळु बाप

बाप म्हणजे कष्टाच आहे गाण
जीवनाच झाड पण बनतो पान
जागृत बुध्दी त्याची आठवे रान
श्रीमंताकडे जाते रे त्याचे धान

बनवीली त्यांने देहाची रे काडी
त्याच्या कष्टाने दारासमोर गाडी
त्याचे कष्ट रे मोठी माझी माडी
लेकरासाठी ते बनले बैलजोडी

माझ जीवन लहानपणी तीळ
माझा बाप कष्टाचा घास गीळ
माझी आई त्याचा रे घाम पीळ
आठवते मज आज कष्टाचे बीळ

(कवी) रंजित अंबादास सदर