साहेब

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 23, 2021, 10:22:13 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक...साहेब*

काही लोक बोलू राहिले
विनाकारण बाहेर पडू नका
पण एक नक्की सांगा साहेब
कोणी बोलले का असं रडू नका

अजून ही घरात बसून राहू
एक वेळ चटणी भाकर खाऊ
पण एक सांगा ना साहेब तुम्ही
तुमचं व्याज भरायला कुठं जाऊ

वाटलं होतं साहेब तुम्ही गरिबाला
जराशी तरी मदत जाहीर करताल
त्या हप्त्या वाल्याना गप्प बसवून
तुम्ही सुखानं घरात बसून जगू देताल

किती जाहीर झाली मदत साहेब
त्याचा हिशोब आम्हा पर्यंत येणार नाही
सांगा तुमच्या दीड हजारांनी साहेब
कर्जाच व्याज ही फेडन होणार नाही

त्यापेक्षा आवर्जून एक करा साहेब तुम्ही
तुमचं कोरोना बाळ घरात आणून सोडा
त्याच्या नावाखाली बाजार तर मांडला आहे
आता त्याच्या बरोबर आमचं ही नाव जोडा

बघा सगळं सुरळीत झालं ना साहेब
आमचं मढ अजून अनाथ नाही झालं
तुमचे व्याजासहित पैसे देऊ साहेब
बुडवणं आमच्या रक्तात नाही लिहलं

✍🏻(कविराज अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर