जीभवाणी

Started by ranjit sadar, April 24, 2021, 08:31:28 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

जीभ अशी कशी ही बोलती
कधी सत्य आतुनी  खोलती
श्रीमंती जीभच दाखवी पाठ
शेवटीच कामी येणारच माठ

सत्याने चला येथेच हो सार
नकोस घेऊ तु खोटा आभार
कर देह  तुझा मानसा पावन
धणापाठी बंद करा तु धावन

जमिनीवर असेल कपडालत्ता
लोक फेकणार शेवटी रे भत्ता
तडपुन मरणार येथे सारे नेते
खोट्या शपता हे जगास देते

वाहत्या बंद पडणार नस धारा
येका गड्यानो माझा हा इशारा
खोट्याची आत्मा भटके राहत
सत्य एक गोष्ट सांगे मी दहात

कवी रंजित अंबादास सदर