मांज्या दिलाची बायली

Started by शिवाजी सांगळे, April 25, 2021, 02:58:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मांज्या दिलाची बायली

मासोली मी पाण्यामंधली रंगाने सावली
सवताच मी तुज्या रं रूपावरती भालली..धृ

कोलीवाऱ्यात चालतोय लई माझा तोरा
मांग पुरं धावत्यात मांज्या इकरची पोरां
गल्यामंदी सोना कपाली चमचम टिकली
कर एक ट्राय तुला जर पटली तर पटली...१
मासोली मी पाण्यामंधली...

गरी मी तरणा रोज रोज दरयाशी जातो
म्हावरां, बोंबील आनी पापलेटा आणतो
सांग मग मासली तुला गं कंची आवरली
बोललीस तर तुला देतो समदीच टोपली...२
मासोली मी पाण्यामंधली...

नको रं पापलेट आन नको ताजा म्हावरां
मी तुजी नवरी अन् होनार तु माझा नवरा
सगल्यांना बग माझी हि जवानी भावली
तुज्याचसाठी बग मी नटून थटून आयली..३
मासोली मी पाण्यामंधली...

सोडून दे सगला तुजा ह्यो फुकटचा तोरा
भवतीनचा गोतावला माझ्या बग तु बंदरा
लग्नाला परवानगी घे तु बापसाची पयली
तवाच होशील तु मांज्या दिलाची बायली..४
मासोली मी पाण्यामंधली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९