कोरोना

Started by Dnyaneshwar Musale, April 25, 2021, 05:43:05 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

गरीब  मरतायत
राजकारणी चरतायत
दवाखाने खच्च भरातायत
ज्याच त्यालाच माहीत दिवस कसे सरतायत

ऑक्सिजनचा तुडवडा
खायला महाग आठवडा
मिळेनास झालं रेमेडिसीविर
हळु हळु सुटत चालले धीर.

कुठं उपाशी कुठं तुपाशी
कुठं आक्रोश कुठं टाहो
तरी सारे लुटतायत
जणू माणसं माणसंच
खायला उठतायत.

कुणी धीर देतेय
कुणी देव होतंय
कुणी कुणासाठी जीव देतेय.
तर कुणी पैशासाठी कुणाचा जीव घेतयं.


बातम्या ही येतात मरणावर
जागा ही उरली नाही सरणावर
आपल्यांचीच आपणच राहतो जिरवत
विसरून जावं सार
एक एक करत जवळची
माणसंच नकळत
चालल्यात हरवत