भिती

Started by शिवाजी सांगळे, April 27, 2021, 12:23:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भिती

अनेक पदरी बांधायचे रस्ते इच्छा माणसाची
वाटू लागली भिती रस्त्यांना आता माणसाची

ओस पडल्या चावड्या अन् साऱ्या गाव गप्पा
चौक, नाक्यासही दहशत बसलीय माणसाची

चालणार कुठवर खेळ हा मांडलाय जो कुणी
का खेळी स्वार्थाची दडलेली यात माणसाची

अविरत लोंढा वाढला कैक झाकल्या देहांचा
स्मशानास केवळ उरली ना भिती माणसाची

सहवास, स्पर्श नको वाटतो कुणाला कुणाचा
तरी झटतेय जीव जगवायला जात माणसाची

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९