मराठीमाती

Started by komal jagtap, April 28, 2021, 05:22:39 PM

Previous topic - Next topic

komal jagtap


माझ्या मराठीचा गंध
माझ्या महाराष्ट्राच्या मातीत
थोर संताची वाणी
घेतो आम्ही मराठी आस्वाद

महान ते महापुरुष
जन्मले माझ्या या मातीत
त्याची शिकवण शिकतो आम्ही
माझ्या या मराठीत

माझ्या राजाच्या शिळा
ऐकू येतात डोंगर, दऱ्यात
माझ्या राजाच्या घोडयाच्या टाफा
गाथा शौर्याची, विजयाची आणि पराक्रमाची ऐकू येते महाराष्ट्र मातीत...

इथे येतो घुंगरांचा आवाज कानी
माझ्या मराठीची परंपरा आहे लयभारी
माझ्या मराठीचा वारसा
घेतला आम्ही आमुच्या हाती
माझी मराठी परंपरा
रूजली इथल्या माती...

इथल्या मातीत रूजली
दया, क्षमा आणि शांती
इथल्या मातीत ऊब मिळते
मायेची, प्रेमाची आपुलकीची

आमच्या मराठी असण्याचा
बाळगतो आम्ही अभिमान
संताची बोली जाणतो
अवघा अखंड महाराष्ट्र परिवार

माणूसकीची गाथा गातो आम्ही सारे
ह्रद्यातूनी ओसांडे प्रेमाचे हे वारे
माझ्या मराठीचा गंध
माझ्या महाराष्ट्राच्या मातीत
थोर संताची वाणी
घेतो आम्ही मराठी आस्वाद

- कोमल जगताप