प्रवास

Started by शिवाजी सांगळे, May 03, 2021, 04:40:30 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रवास

अश्रूंचे मोल आता समजतो कोण येथे
रोजच चितेवर जळते नव-नवे प्रेत येथे

टाळतो माणूस माणसा वहिवाट झाली
स्पर्श आणि श्वासही जहरी झालेत येथे

किंमत ठरवावी रे कुणी तुझ्या श्वासांची
संधीसाधू झालेत जीवनदाते अनेक येथे

कदर भावनेची शिलकीत चौकटी पुरती
उंबरठ्या बाहेर आहे फक्त व्यवहार येथे

ओसंडून वाहतो आक्रोश चारही दिशांना
वाढणाऱ्या भयाची जाणीव कोणास येथे

सांभाळ अश्रुंना आता तुझ्या स्वतः साठी
शेवटापर्यंत तुला प्रवास हा करायचा येथे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Atul Kaviraje

     शिवाजी सर, अतिशय विचार-पूर्वक आपण रचलेली  ही गजल कम  कविता, वास्तवाचे भयानक रूप दाखवून जाते. "प्रवास", हा कसा एकला, खडतर, काट्याकुट्यानी भरलेला असतो असे मला या कवितेतून जाणवले. माणसाच्या सुख दुःखांच्या भावनांशी निगडित, हि आपली कविता आवडली.

     एकाकी पणाची जाणीव मला या कवितेतून झाली. चपखलपणे बसवलेली सर्व कडवी आपण एकत्र ओवून एक सुंदर कविता यातून प्रसवली, त्यातील गर्भितार्थ समजण्यास अतिशय कठीण असाच आहे.

     प्रवास माझा हा एकला
     शेवटपर्यंत नाही कुणी साथीला
     मर्यादा असतात साऱ्यानांच इथे,
     अर्थ नाही फुका वाट पाहण्याला.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०६.०६.२०२१-रविवार.