खरे काय?

Started by AjinkyaD, May 05, 2021, 01:58:17 AM

Previous topic - Next topic

AjinkyaD

काय 'खरे', अन काय 'खोटे'!
कालवर जे 'सत्य' होते,
ते अचानक खोटे कसे होते?
पण जे खरे सतत वाटत होते,
ते सत्य कसे मानू ?
असतील हो नाण्याला दोन बाजू,
पण कोणी सांगेल कोणती खारी बाजू?
नाही कळला भेद,
'समजण्याचा' अन 'असण्याचा'
म्हणून बळी गेला 'श्रावणाचा',
पण सध्या,
असे अनेक 'श्रावण' बळी जातायेत !
मग जबाबदार कोण?
'श्रावण' की धनुष्यधारी राजा 'दशरथ'?
मग परिस्थिती लाच दोष देऊन,
आपणच कधी 'श्रावणाचे', 'दशरथ'बनतो,
हे आपल्यालाच कळत नाही!

आजही काहींना वाटत असेल कि करोना नाहीए,
पण तो आहे, तो अजून गेलेला नाहीये आणि त्याला घाबरा !
स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या !

:अजिंक्य