आपलीं माणसं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 06, 2021, 07:35:21 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आपली माणसं*

परमेश्वर आहे तर का सोडून चालली आपली माणसं
तो आहे देवळात बंद पण परकी वागली आपली माणसं

किती पैसा कमवणार तुम्ही तुम्हाला देव मानलं म्हणून
महाग चष्मा चढवल्यावर परकी वाटली आपली माणसं

ज्यांना देव समजून किती विश्वास ठेवता येड्या हो तुम्ही
त्यांनीच शेवटी पैशासाठी मारून टाकली आपली माणसं

जाऊद्या जेव्हड लुबाडायचं तेव्हडं लुबाडून घेतलं तुम्ही
पैशापायी आज स्मशान रांगेत अडकली आपली माणसं

श्वास गुदमरला होता शब्द ही सारे शेवटी संपले होते
आज पाहिलं माणुसकी वाचून विटली आपली माणसं

खोटा मुखवटा चढवून येतात काही माणूस गेल्यावर इथं
मदत मागितली तर खोट्यापणानं रडली आपली माणसं

भरदार झालेलं झाडं अस निखळून जाईल वाटलं नव्हतं
कसा काळजचा ठोका चुकवून चालली आपली माणसं


*कोरोना काळात स्वतःबरोबर घडलेला प्रकार*
*शब्दात मांडला यात कोणाला दुखवायचा हेतू नाही*

*कविराज.अमोल ..अहमदनगर.*
*😔😔😔😔😔 आज निशब्द*