सहवास तुझ्या प्रेमाचा

Started by Rushi.VilasRao, May 06, 2021, 11:36:56 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

नसते ती जवळ आता...
आता आठवणी फक्त येत असतात...
नसते ती जवळ आता...
तीझे भास फक्त होत असतात....
लाजताना ती दिसत नाही...
डोळे फक्त तिला शोधत बसतात...
दिलखुलास ती हसन रोज आता दिसत नाही...
मी मात्र एकटाच असून कान तेवढे वाजत असतात....
सुवास तीझ्या काळ्याभोर केसांचा आसपास हवेत आता दरवळत नाही...
कितीही सुंदर पुलंचा वास आता मनाला माझ्या भोवत नाही...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
तीला भेटण्याची रोजचीच वेळ येता आता येत नाही...
थंड हवेची झुळूक येत रहाते अन् श्वास स्वतःचे च बोचत राहतात....
स्पर्श तीझ्या हातांचा हाताला माझ्या आता होत नाही...
कुठे गेली ती? हे विचारण्यात मात्र मन माझं थकत नाही...
वेळ कितीही गेला आता तरी सोबत मात्र जात नाही...
घड्याळाचे काटे पुढे सरकत रहातात वेळ फक्त सरत नाही...
वाटा सगळ्या त्याच आहेत पण सरता मला सरत नाहीत...
वाटे वर त्या सगळ तसच आहे पण चालताना ते सोबत नाहीत...
भूक नेहमीच प्रेमाची होती शरीराची कधीच बाळगली नाही...
सोबत नेहमी होतो पण सहवास टिकवता आला नाही...
भूतकाळात तुला शोधत बसतो...
वर्तमान माझा पुढे सरकत नाही...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan