जीवन दे रं थोडं ??

Started by Ashok_rokade24, May 06, 2021, 08:47:41 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

जीवणं दे रे थोडं देवा
जीवणं दे रं !
कुणा कुणाला मागू
सारी बंद कवाडं ? 

पाठीशी झोळीत तान्हा
हातात पतीच्या वेदना
पदराला उपाशी लेकरू
कां काळीज तुटना थोडं?
माणसातल्या देवा आता
देव्हारा सोड रं !!

प्रसंग पडला ऐसा
गाठीचा सरला पैसा
पोशिंदा हा आमचा
टाकून देऊ कैसा
आयुष भर करिन चाकरी
वाचव हा जीव रं !!!

विनवण्या गेल्या वाया
झाली थंड पतीची काया
फुटलं काळीज आक्रोशानं
नाही आली देवाला दया
पैशासाठी सैतान वेडा
कसा म्हणू देवं रं !!!!

बाळांच करुन रूदन
श्मशानी ऐकतं कोण
बेहालही माता रडून
ऊठे पुन्हा ती जोमान
सारे तिथे सम दुखी:
कुणी करावी किवं रं !!!!!
(अपुर्ण )
06/05/2021.
अशोक मु.रोकडे.
मुंबई.

Ashok_rokade24

धन्यवाद सर जी !!!



अशोक रोकडे .