मैत्री

Started by ranjit sadar, May 07, 2021, 05:59:55 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

बालपणी शेवट पर्यंत ची मैत्री
कधी साथ न सोडण्याची खात्री
दिवसभर गंमती अभ्यास रात्री
आई देई केळीपाना जेवन पात्री.

कपडे धुन्याची असे नदीत जुडी
नदीत घेत असे मी मैत्र पण बुडी
उंच टेकडीवर होती जोरात उडी
वाटप होती गोड सुपारीची पुडी

कवठाची पाने लागत असे ग्वाड
लपंडावात होत खुप मोठं ख्वाड
शोधण्यास मित्रांना होती ही रीत
लपून बसत की होत नव्हती जीत

कवी रंजित आंबादास सदर