आई जन्म दे पुन्हा पुन्हा

Started by ranjit sadar, May 10, 2021, 03:17:47 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

आई जन्म दे पुन्हा पुन्हा

आई तुझ्या पोटी जन्म
घ्यावे मी ग पुन्हा पुन्हा
या देहाला सिद्ध करुण
मरून जावे पुन्हा पुन्हा.

लहान चिमुकलीच बोट
व्हावे मी ग पुन्हा पुन्हा
तुझी प्रेमळ ज्योत आई
व्हावे ग मी पुन्हा पुन्हा.

बोबड बोलता हा ओठ
व्हावे मी ग पुन्हा पुन्हा
अमृताचा दुधी घोट तो
व्हावे मी ग पुन्हा पुन्हा.

शाळेचा जातांना कोट
दयावे तु ग पुन्हा पुन्हा
कोरी दहाची नोट तु ग
दे दुकानी पुन्हा पुन्हा

बोटाला धरून चालता
पाहावे मी पुन्हा पुन्हा
लहानपण पाहुन मोठ
व्हावे मीच पुन्हा पुन्हा

कवी रंजित अंबादास सदर
मो /९५७९८६८७४८