संपवा महामारी । बा विठ्ठला

Started by Nikhil Shivaji Chavan, May 10, 2021, 07:32:04 PM

Previous topic - Next topic

Nikhil Shivaji Chavan

स्वस्त झाले येथे। किती हे मरण।
पदोपदी सरण। पेटताहे ॥

नको दावु देवा। आणीकते हाल।
पांघरावी शाल। कृपेची आता ॥

नको मिटू डोळे। पहा हा आकांत।
कैसा उभा शांत। तरी विटेवर ॥

राही रुक्मा पती। आवरा हा पाश।
अन्यथा तो नाश। ठरलाची ॥

विठुदास म्हणे। तुझेच लेकरे सारी।
संपवा महामारी। बा विठ्ठला ॥

नि. शि. चव्हाण
(निखिल रेखा शिवाजीराव चव्हाण)
मो.नं : ९३७३९३१२१२