कळलेच नाही

Started by Balaji Lakhane (guru), May 15, 2021, 08:27:15 PM

Previous topic - Next topic

Balaji Lakhane (guru)

_कळलेच नाही..._

कसा वाहत गेलो कळलेच नाही,
कसे प्रेम झाले कळलेच नाही.!

दिसून येतो मला माझाचं वेडेपणा,
असा का वागतो कळलेच नाही.!

तू जेव्हा माझ्या समोरी असते,
तुझ्यात कसा हरवतो कळलेच नाही.!

गुलाबी ओठातून तुझे गुलाबीच बोल.
थेट काळजात उतरतात कळलेच नाही.!

असतो मी एकटा ज्या ज्या वेळी ,
कशी कवितेत येतेस कळलेच नाही.!

@बाळाजी लखने (गुरु)
   उदगीर जिल्हा लातूर
   भ्र...८८८८५२७३०४