तुझ्या लग्नानंतर...

Started by Balaji Lakhane (guru), May 15, 2021, 08:30:29 PM

Previous topic - Next topic

Balaji Lakhane (guru)

------तुझ्या लग्नानंतर---------

स्वतःच शोधतो स्वतःला आजून
सापडलो नाही तुझ्या लग्नानंतर.!

तू मात्र असशील त्याच्या  मिठीत
मी एकटाच सये तुझ्या लग्नानंतर.!

तुझ्या माझ्यात आता न संपणारे
अंतर झाले फक्त तुझ्या लग्नानंतर.!

छान होतो तुला भेटण्या आगोदर
बघ हालत माझी तुझ्या लग्नानंतर.!

कुठलं नातं आणि कुठलं प्रेम असच
बोललीस ना तू तुझ्या लग्नानंतर.!

फुला सारखी कोमल तू का कठोर
झालीस प्रिये तू तुझ्या लग्नानंतर.!

कशी निर्माण होईल आता कविता,
तोडलस ना ह्रदय तुझ्या लग्नानंतर.!

प्रेम केल्याची खंत वाटते मरणे
हि सोपे वाटते तुझ्या लग्नानंतर.!

-----बालाजी लखने (गुरु)-----
        उदगीर जिल्हा लातूर
        भ्र...८८८८५२७३०४