प्रगल्भ संस्कृती

Started by Ashish Doshi, May 16, 2021, 02:41:52 PM

Previous topic - Next topic

Ashish Doshi

बथ्‍थड होताहेत जाणिवा, संवेदना सांगताहेत |
बलाढ्य येथे सोन्याचे, ढोल बडवताहेत || १ ||

आवाज त्या आरोळ्यांचा, बहिरे ऐकताहेत |
लपून मागे मुखवट्यांच्या, दृष्टांध फिरताहेत || २ ||

श्रेष्ठ ते कठपुतळ्यांचे, खेळ खेळताहेत |
पुतळ्या त्या धन्य, त्यांचे पांग फेडताहेत || ३ ||

मिंध्य ते वासानांचे, बांध फोडताहेत |
स्वकीयजनांच्या रक्ताचे, पाट वाहताहेत || ४ ||

बकासुर हे नवयुगातील, जिभल्या चाटताहेत |
पामर ते, जे स्वतःचे, भीमरूप विसरताहेत || ५ ||

दाखविती मर्दुमकी, संसाधन उपभोगात |
व्याख्या बदलली, गुलामगिरीची नकळत || ६ ||

पैसा, मनोरंजन, अहंभाव आधुनिक देव |
भूक शमविण्यास, लागतील पृथ्वी कित्येक || ७ ||

असे तरी मनांस, विवेकाची आसं |
होऊनी उपरती, घडेल का प्रगल्भ संस्कृती || ८ ||

आशिष दोशी
कोल्हापूर, १६-०५-२०२१
९४२१०३४४५२