बाईक आणि ती

Started by siddhesh 68, May 17, 2021, 09:25:31 AM

Previous topic - Next topic

siddhesh 68

बाईक आणि ती

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा दिसली पिवळी,
माझ्याकडे बघून खुदकन हसली ती कळी|

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा होती गुलाबी,
बाईक थांबव्हताच तिचा सुगंध आमच्या नाकात दरवळी |

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा जांभळी,
ती मागे अदबशीर बिलगून मला बसली|

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिनी साडी नेसली काळी,
वाटले मला हीच अ्लाउद्दीन ची जस्मिन किंवा सोनपरी|

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा करडी,
आभाळाचा रंग, पावसात भिजू आम्ही ओले चिंब|

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा नारंगी,
आज आम्ही विकत घेतला खाऊ आणि थोडीशी बुंदी |

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा निळी,
बहुतेक हिला माहितीत  ते समुद्री खडक प्रवाळी|

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा हिरवी,
खोली नंबर 420, गल्ली तेरावी!

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा होती पांढरी,
उसाचा रस किंवा कपाशी!

बाईक वर निघालो सुसाट,
रस्त्याच्या कडेला झाडें घनदाट,
आज तिची वेशभूषा लाल,
हिला मीच करणार प्रपोज,
दाखवतोच हिला मी नाही बचू,
नको चावू माझा गाल....||


सिद्धेश सुधीर देशमुख
11 मे 2021