चक्री -वादळ आलय घेऊन पाऊस !

Started by Atul Kaviraje, May 18, 2021, 02:50:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   काय  चाललंय , कलियुग  तर  नाही  ना  अवतरले  ?
अवकाळी   पाऊस  आज  अवकृपा  दाखवीत  आहे .
सदर  लेख  लिहिताना  आज  म्हणजे  दिनांक  17.05.2021, रोजी   बाहेर  सतत  पाऊस  पडत  आहे . जून  महिना  राहिला  दूरच , पण  मे महिन्यातच  पावसाने  ठाण  मांडले  आहे , तो  अविरत  बरसत  आहे . हे  सर्व  त्या  सागरातल्या  कमी -जास्त  वाऱ्याच्या दाबाच्या   पट्ट्याने    होत  आहे ,कि   ज्यामुळे , चक्री -वादळाची  भीती  निर्माण  झाली  आहे , आणि  त्यामुळेच  तर  पावसाने  ही  अवकाळीच  मर्यादा  ओलांडून , धरीत्रीस  आपल्या  आगमनाने  न्हाऊ  घातले  आहे . असो , हे  निसर्गाचे   चक्र  असेच  सुरु  राहील . त्यात  बदल  घडविणे  हे  मानवाच्या  शक्ती  बाहेरचे  आहे , जे  जे  होईल  ते  फक्त  पाहात  राहावे , हेच  आपल्या  हाती  आहे .   

-----श्री अतुल एस परब
-----मंगळवार-18.05.2021.