देवा तु काय केले

Started by ranjit sadar, May 19, 2021, 08:23:40 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

हे देवा कोरोना पाठऊनी तु काय केले|
पुण्यकारी देह पण येथे हे खुपच मेले||

तुच रचलास या जगी रोगाचा हा धागा|
देवा का बनलास हा विषकारी तु नागा||

राक्षस होते त्यांचा तर वाजला रे डंका|
पण गुन्हा नसता, पेटली जगाची लंका||

तुझ्या तोंडात जगाने पेढा घास टाकले|
तुझ तोंड आता का रे हे लाव्हा उकळे||

काहीतरी कर हे देवा सोड तुझा हा हट्ट|
काढ ह्या पृथ्वीवरच तुच रे देवा संकट||

कवी रंजित आंबादास सदर
मो=09579868748