लांब कुठे तरी फिरायला जावं....

Started by Rushi.VilasRao, May 19, 2021, 06:00:15 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

लांब कुठे तरी फिरायला जावं....
सोबत पावसाची सर असावी....
हात तुझा माझ्या हातात असावा....
त्यात आयुषयभर साथ देण्याची आस असावी....
सोबत तुझी बडबड अन् मस्ती असावी....
त्यात प्रेमाची अनमोल भर असावी....
अडवायला सोबत कोणी नसावं....
ना कोणाला कोणाची बंधन असावी....
लांब कुठे तरी फिरायला गेल्या वर
लवकर परत जाण्याची घाई नसावी....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
रमून जावं त्या पावसात चिंब
मधून मधून आडोश्याला थांबायला डोंगरावर एखादी खोप असावी....
बाजूलाच चहा ची टपरी,
अन् त्याच्या कडेच गरम गरम भजीची प्लेट असावी...
वाटत क्षण तो कधी संपू नये....
पण कल्पनेला सत्याची ओढ असावी....
जी आस सोबतीची माझ्या मनात आहे....
ती आस तीझ्या ही मनी असावी.....
लांब कुठे तरी फिरायला जावं....
सोबत पावसाची सर असावी....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan