☺❤ जीवन ❤ ☺

Started by Sandhya Gadge-Sinnarkar, May 20, 2021, 09:35:16 AM

Previous topic - Next topic

Sandhya Gadge-Sinnarkar

☺❤ जीवन ❤ ☺

मानवाला असतो 
एकच  जन्म , एकच  मृत्यु
मध्यंतरी  घडतं  एक नाटक
जीवन  त्याचं  नाव


जीवनात  कधी  सुख  असतं
जीवनात  कधी  दुःख  असतं
जीवन  कसं  जगायचं  असतं
ते  आपणच  ठरवायचं  असतं


जीवनाच्या  वाटेत  कधी  असतो  भरपूर  अंधार
अंधारातून  शोधायचा  असतो  उदयाचा  प्रकाश
प्रकाशाकडं  झेप  घेत  जायचंच  असतं
जीवन  हे  असंच  असतं


जीवन  असतं  नदीसारखं
वाहताना  असतात  भरपूर  अडथळे
अडथळ्यांवर  मात  करून
समुद्राला  जाऊन  मिळायचं  असतं


जीवनाच्या  वाटेत  कधी  असतात  भरपूर  घाट
ती नागमोडी  वळणे  घेत  शोधायची  असते  यशाची  वाट
यशाच्या मागे  लागायचं  असतं
जीवन  हे  असंच  असतं


परमेश्वर  देतो  तेवढयात  समाधान  मानायचं  असतं
कमी  दिलं  म्हणून  रागवायचं  नसतं
त्यातच  भागवून  घ्यायचं  असतं
जीवन  हे  असंच  असतं

जीवनात  खूप  नाव  कमवायचं  असतं
नाव  कमवून  जीवनाचं  सार्थक  करायचं  असतं
कारण , जीवनाला  असतो  एकच  शेवट
मृत्यु  त्याचं  नाव
खूप  दूर  असतं  त्याचं  गाव
म्हणून  आपणच  आपलं  ठरवायचं  असतं
जीवन  कसं  जगायचं  असतं ?
जीवन  कसं  जगायचं  असतं ?
                   ---------- संध्या  गडगे  - सिन्नरकर