नियम हाच आहे

Started by कदम, May 21, 2021, 01:56:09 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ नियम हाच आहे                         
--------‌---------------------------------------------------------
नियम हाच आहे मी तुझी खास आहे
तुला पचली नसली तरी तोंडावर माझाच वास आहे

संयम हाच आहे मी तुझी दास आहे
शेवटी काच आहे तोमतर ञास आहे

कायम हाच आहे शेवटी माझाच विनास आहे
गटकवणार्यापेक्षा रिजवणार्यासच विश्वास आहे

नियम हाच आहे मी मोकळा श्वास आहे
पैज लावून घेणार्यास विचारा मी कशाचा घास आहे

आयाम हाच आहे माझाच प्राश आहे
पेग बनवून पेणारच खरा माझा बाॅस आहे

चरम हाच आहे शरम नाश आहे
गटागटा ढोसणार्याच्या जीवाला माञ धास आहे

नरम मीच आहे माझ्यासाठीच ग्लास आहे
तुझ्या घशात उतरण्याची मलाही आस आहे

गरम तुच आहे तुझी नरडी ओस आहे
तुला चैन पडत नाही कारण गरजेचा मी डोस आहे

कारण ठोस आहे विरोधकांचा रोष आहे
समज आहे तुझा मी तुझ्या ज्वानीचा कोष आहे

नियम हाच आहे अमर्याद ढोस आहे
माझ्या मादकतेची तुलाच तर हौस आहे

--------‌---------------------------------------------------------
-कदम.के.एल.