बोलण्यातच आयुष्य निघून जाईल

Started by कदम, May 21, 2021, 02:28:11 AM

Previous topic - Next topic

कदम

बोलण्यातच आयुष्य निघून जाईल
जे करायचा ते राहून जाईल
बोलून बोलून बोलून तोंडाला लाळ येईल
नंतर जंतरमंतर करतोस मनून आळ येईल
तुला पण ऐकून ऐकून कंटाळ येईल
करणार्यांना करून करून कटाळ येईल
आयुष्याचं स्वप्न रटाळ होईल
अजून उजडत कसं नाही
मनून नुसती सकाळ होईल

- कदम.के.एल.

Atul Kaviraje

बोलण्यातच आयुष्य निघून जाईल
------------------------------------

           
कदम सर, कविता आवडली, त्यातलं सारही कळलं.

     खरं आहे, आयुष्यात बरंच काही करण्यासारखं आहे. नुसतं जीवन तर प्राणीही जगतात. परंतु जीवन जगण्याचा खरा अर्थ मनुष्याला चांगलाच कळला आहे.

     म्हणून, बोलून, वाद विवाद करून, किंवा भांडण करून ते वाया घालवू नये. खऱ्या अर्थाने ते जगावे.

     आयुष्य जगण्यात खरा आहे अर्थ
     जर त्यात नसेल कोणताही स्वार्थ
     वादाचा त्यात लवलेशही नसावा
     त्याने साधेल खरा परमार्थ.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक- रविवार -२३.०५.२०२१

कदम

#2
आभारी आहे.
माझ्या कवितेच्या भावना आपल्या पर्यंत पोहचल्या हे आपल्यासारख्या वाचकांच्या प्रेमामुळे मी आणखी चांगले साहित्य आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीन.
🙏

आपण सिने दिग्दर्शक आहात का.?